MLC Elections : विधानपरिषदेतून दोन भाईंचं पत्ता कट? भाई जगताप आणि रामदास कदम यांना मिळणार का संधी?
Continues below advertisement
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर गेलेल्या दोन भाईंचं यावेळी काय होणार याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांकडून निवडून जाणाऱ्या आमदारांना विजय मिळवण्यासाठी पहिल्या पसंतीची 77 मतं आवश्यक असतात. यावेळी काँग्रेसची सदस्य संख्या अवघी 29 असल्यानं काँग्रेसला विजय मिळवणं अवघड बनलंय. त्यामुळे याआधी निवडून गेलेले काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांची आमदारकी धोक्यात आलीय. शिवसेनेचे रामदास कदम इथून दोनदा विधान परिषदेवर निवडून गेले. पण अलिकडेच वादात सापडल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे दोन्ही पक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Continues below advertisement