कल्याणमध्ये मनसेकडून मोफत लसीकरण,लसीकरणासाठी पैसे खर्च का करत नाही? आमदार राजू पाटलांचा सरकारला सवाल
Continues below advertisement
एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा प्राप्त न झाल्याने बंद आहेत. तर दुसरीकडे मनसेतर्फे आज कल्याण ग्रामीण भागात कल्याण शीळ रोडवरील प्रीमियर मैदानात मोफत लसीकरण सुरू करण्यात आलंय. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यँत 2000 नागरिकांचे निशुल्क लसीकरण करण्यात येणार आहे. आज लसीकरणास रिक्षा चालकांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
Continues below advertisement