यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात तरुणावर वाघाचा हल्ला, तरुणाला शेतात फरफटत नेऊन ठार केल्याचा अंदाज
यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील पिवरडोल येथील अविनाश लेनगुरे हा 18 वर्षाचा युवक काल रात्री गाव जवळच शौचास गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला गावा शेजारीच असलेल्या एका शेतात फरफटत ओढत घेऊन जाऊन ठार केले.
आज पहाटे ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली वनविभागाची टीम घटनास्थळावर दाखल झाली बराच वेळ वाघ त्या झुडपात होता वाघाला त्या झुडपातून हुसकवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला आणि बऱ्याच वेळानी वाघाने तेथून पळ काढला तिथे गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Yavatmal Tiger Attack | यवतमाळमधील सुन्ना गावात वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद