BEED : बीडमधील जळगावमध्ये जलक्रांती, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावात फुलल्या फळबागा

Continues below advertisement

यावर्षी मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाला असला तरी दरवर्षी अशी परिस्थिती नसते आणि त्यामुळे पावसाच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.. म्हणूनच गेवराईच्या जळगाव मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी घेतली आणि याच शेततळ्याच्या माध्यमातून गावाची आर्थिक समृद्धी झाली. दोन हजार लोकवस्ती असलेलं हे गेवराई तालुक्यातलं गायकवाड जळगाव कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आणि ओस पडलेली शेती याच दुष्काळाला गावातून हद्दपार करण्यासाठी या शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनाचा फायदा घ्यायच ठरवल आणि मागेल त्याला शेततळे या योजनेतून गावातील दोनशेच्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे बांधले आणि याच शेततळ्याच्या पाण्यावर सुरू झाली या गावची जलक्रांती आणि समृद्ध शेती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram