म्हाडा लाभार्थ्यांना हक्काची घरं कधी मिळणार? अडीच वर्ष उलटूनही विजेत्यांना घरांचं वाटप नाही

Continues below advertisement

एकीकडे तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून अनेक नवे जम्बो कोविड सेंटर प्रशासन उभारत आहे. मात्र, पहिल्या लाटेत प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून म्हाडाच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्या अजुनही प्रशासनानं ताब्यातच ठेवल्या आहेत. त्यामुळे 2018 मधील लॉटरीत घर लागलेल्या म्हाडाच्या लाभार्थ्यांना दोन वर्ष उलटल्यानंतरही इमारतींचा ताबा मिळालेला नाही. आणि प्रक्रियाही सुरु झालेली नाही. महापालिकेकडून इतर सोयीसुविधा उभ्या केल्या जात असतांनाही आणखी किती दिवस लाभार्थ्यांना म्हाडा च्या घरांपासून वंचित ठेवणार असा सवाल लाभार्थ्यांनी केलाय. कोविड आणि लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्यांच्या घरांना. लवकरात लवकर ताब्यात द्यावे अशी मागणीही केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram