'चंद्रकांतदादांचं पत्र म्हणजे राजकीय स्टंट', चंद्रकांत पाटलांच्या पत्रावर रोहित पवारांचा टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना लिहिलेले पत्र हे राजकीय स्टंट असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारला पत्र लिहायचं होतं तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत लिहायला हवं होतं असं देखील पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने राज्याच्या हक्काचा जीएसटीचा वाटा आणखी दिलेला नाही, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमध्ये गुजरातला भरीव मदत केली, मात्र महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत केंद्र सरकारने मदत दिलेली नाही. अशात फडणवीस राज्य सरकार समोरील अडचणी वाढवण्याचं काम करून जनतेला सरकार अडचणीत असल्याचा आभास निर्माण करून आणि आम्ही सक्षम पर्याय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीचं असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola