WEB EXCLUSIVE : भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं आता काय होणार? विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं काय?
Continues below advertisement
1964 साली जाबुवंतराव धोटे यांनी बाळासाहेब भारदे अध्यक्ष असताना त्यांच्या दिशेनं पेपरवेट फेकूनमारला होता. त्यावेळी जाबुवंतरावांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. सभागृहात बेशिस्तता निर्माण झाली, पदाला न शोभणारं कृत्य झालं तर अध्यक्षांना कारवाईचे अधिकार असतात. भास्कर जाधवांना निलंबन करण्याचे हे अधिकार रितसर होतेच. 12 आमदार एक वर्ष विधानभवनाच्या प्रांगणातही प्रवेश करू शकणार नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर निलंबित आमदार मतदान करू शकणार नाहीत. मात्र, आमदार फंड, कुपन्स, भत्ता हे अधिकार अबाधित राहतील. इतर संसदीय कामे ते करू शकतील. मात्र विधीमंडळाच्या बैठकांना त्यांना येता येणार नाही.
Continues below advertisement