
Measles Special Report : मुंबईवर गोवरचं संकट, जाणून घ्या लक्षणं? ABP Majha
Continues below advertisement
गोवराची लागण केवळ लहान मुलांमध्येच नसून प्रौढांमध्येही या संसर्गाची लागण होताना दिसतंय... मुंबईतील एम पूर्व प्रभागात 18 आणि 22 वर्षांच्या दोघांची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिकेकडे नोंद करण्यात आलीय.. हे दोन्ही रुग्ण अंगावर पुरळ उठणे तसेच ताप येण्याच्या तक्रारीसाठी खासगी डॉक्टरांकडे गेले होते. या रुग्णांना लक्षणाधारित उपचारासह अ जीवनसत्त्वाची मात्रा देण्यात आली. आता या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गोवराच्या संसर्गाची लागण लहान बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही होते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय...
Continues below advertisement