Women Medical : महिलांद्वारे चालवण्यात येणारं पहिलं मेडिकल! औषधांची डिलिव्हरीदेखील महिलाच करणार
पूर्णपणे महिलांद्वारे चालवण्यात येणारं भारतातील पहिलं मेडिकल स्टोअर आजपासून मुंबईत सुरू करण्यात आलं. याचं वैशिष्ट म्हणजे सिक्युरिटीपासून तर औषधांची होम डिलिव्हरी सर्वकाही महिलाच हाताळणार आहेत. हे मेडिकल स्टोअर 24 तास सुरू राहणार आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात पूर्णपणे महिलांद्वारे चालवण्यात येणार आणखी मेडिकल स्टोअर सुरु करण्याचा वेलनस फॉरएव्हरचे मालक मोहन चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.