Thane : ठाणे महापालिकेकडून मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, Eknath Shinde यांच्या हस्ते लोकार्पण
Continues below advertisement
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, खासदार कुमार केतकर, भाजप आमदार संजय केळकर, मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पोखरण रोड नं 2 येथे ठाणे महापालिकेने उभारलेल्या या वसतीगृहात 50 विद्यार्थ्यांना राहता येणार असून यामध्ये जेवणाची सुविधा अंतर्भूत आहे. प्रत्येक खोलीमध्ये पलंग, कपाट, अभ्यासासाठी टेबल, खुर्ची, गरमपाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच इमारतीच्या पुढील बाजूस पंधराशे चौ.फूट जागा खेळण्यासाठी आणि पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे.
Continues below advertisement