Mumbai Water from Air : मेघदूत मशिनद्वारे मुंबईत हवेतून पाण्याची निर्मीती कली जाणार ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवर हवेपासून पाण्याची निर्मिती करणाऱ्या मशिन्स बसवण्यात येणार आहेत. मुंबईतील हवामानाचा वापर करून हवेतील आर्द्रतेपासून पिण्यासाठी पाणी तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सहा स्थानकात अशा १७ मेघदूत मशिन्स बसवण्यात येणार आहेत. अॅटमॉस्फीअर वॉटर जनरेटर मशिनद्वारे हवेतून पाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हे पाणी पिण्यासाठी शुद्ध असेल अशी माहिती देण्यात आलीय. हवेतील आर्द्रतेचा वापर करून शुद्ध पाण्याची निर्मिती करण्याचं हे तंत्र हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेनं विकसित केलं आहे. मुंबईत सीएसएमटी रेल्वे स्थानकात ५, दादरमध्ये ५, ठाण्यात ४ आणि कुल्ला, घाटकोपर, विक्रोळी स्थानकात प्रत्येकी एक मशिन बसवण्यात येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Central Railways Machines MUmbai AT STATIONS GENERATION OF WATER FROM AIR USAGE OF WEATHER FROM HUMIDITY WATER FOR DRINKING 17 MEGHDOOT MACHINES WATER GENERATORS