Lingayat Saint Shivamurthy Muruga यांच्याविरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल : ABP Majha

कर्नाटकातले लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आल्याचं समजतं. वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी शिवमूर्ती यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कर्नाटकातील चित्रदुर्ग इथं निदर्शनं करण्यात आलीय. लिंगायत मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ओदनदी सेवा या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेला त्यांच्यावरील अत्याचारांची माहिती दिल्यानंतर संस्थेनं ही माहिती जिल्हा बालकल्याण समितीला कळवली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली. १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचं गेल्या साडेतीन वर्षांपासून शोषण करण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola