Wadhwan Port | वाढवण बंदराविरोधात मच्छिमारांचा एल्गार; माहिमच्या रेतीबंदर परिसरात समुद्रात आंदोलन
Continues below advertisement
केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईतील कफ परेड ते डहाणूच्या झाईपर्यंत कोळीवाडे आणि गावांमध्ये बंद पुकारला आहे. या बंदला अनेक मच्छीमार संघटना तसेच रिक्षाचालक-मालक संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. किनारपट्टीवरील बाजारपेठा, मच्छीबाजार बंद ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement