Virar : विरारमध्ये रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला, सोलर पॅनेल वादातून सोसायटीत मारहाण
विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरात रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला झाला. सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्याच्या वादातून हितेशकुमार या अधिकाऱ्याला लाठीकाठीने मारहाण करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत दोन व्यक्तींनी हल्ला केला. पीडित अधिकाऱ्याने हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगितले असून, बोलीन्ज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.