Virar Fire : लक्ष्मीपूजनाच्यावेळी विरारमध्ये आग, फटाक्याच्या ठिणगीमुळे तीन ठिकाणी आग
Continues below advertisement
विरारमध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे तीन ठिकाणी आग लागल्याची घटना घडलीये. विरार पूर्वेच्या गोपचर पाडामध्ये फटाक्याच्या ठिणगीमुळे कापसाच्या गाळ्याने पेट घेतला. तर विरार पूर्वेच्या मोहक सिटीमध्ये कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणा-या बांबूच्या स्टोरेजला रॉकेटमुळे आग लागली. दुसरीकडे विरार पश्चिमेच्या नवापूरमध्ये रॉकेटमुळे नारळाच्या झाडाने पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Continues below advertisement