Special Report Virat Kohli : विराटला हार्दिक पंड्यानं कसं प्रोत्साहन दिलं?
विराट कोहलीनं त्याच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी उभारली आणि टीम इंडियानं पाकिस्तानला नमवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात विजयी सलामी दिली. ही झाली कालची मोठी बातमी. पण या खेळीदरम्यान विराटच्या डोक्यात काय विचारचक्र सुरु होती? त्याचं शरीर आणि त्याचं मन एकमेकांना काय सांगत होतं? विराटला हार्दिक पंड्यानं कसं प्रोत्साहन दिलं? या तुमच्या मनातल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांना मिळालीयत. अर्थातच विराट कोहलीसोबत झालेल्या छोट्याशा संवादादरम्यान त्यांना ही उत्तर मिळाली. पाहूयात सुनंदन लेले यांनी सिडनीहून पाठवलेला रिपोर्ट.