Sindhudurg Vinayak Raut : तुमच्यासारख्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही : विनायक राऊत
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईत विमानतळापासून सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा प्रारंभ करणाऱ्या राणेंनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. थोड्याच वेळात राणे 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजे वांद्र्यात दाखल होणार आहेत. तिथं राणेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. राणे आज शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावरही अभिवादन करण्यासाठी गेले. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचा विरोध नाही असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. तरीही पोलिसांनी याठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. यानंतर Vinayk Raut यांनी Nanrayan Rane आणि भाजप वर घणाघात केला आहे.