Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू

Continues below advertisement

Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू
वसई येथील वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली.. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.. 
वसईतील वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी पोकलेन ऑपरेटर राकेश यादवांच्या नातेवाईकांनी सरकार विरोधात तीव्र नाराजी दर्शवलीय. गेल्या १७ दिवसांपासून राकेश यादव यांचा शोध सुरू असून काम सुरू असताना सिमेंटचा गर्डर कोसळल्यानं ही दुर्घटना घडलीय. दरम्यान या दुर्घटनेनंतर ४ दिवसांपासून बचावकार्य थांबवण्यात आल होतं मात्र मुख्यमंत्री येणार म्हणून मशीन पुन्हा आणण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलाय. 
वसईजवळील वर्सोवा सूर्या प्रकल्पाजवळ झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत. गेल्या १७ दिवसांपासून बचावकार्य अजूनही सुरूच आहे. वसई खाडी जवळील ससूनवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. २९ मे या दिवशी सिमेंटचा गर्डर कोसळून पोकलेनसह ऑपरेटर ५० फूट खोल खड्ड्यात गाडला गेलाय. अचानक तेथील माती खचल्याने ही दुर्दैवी घटना घडली होती. गेल्या १७ दिवसांपासून हे बचावकार्य सुरू आहे. 
-----

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram