Versova Cylinder Blast | दुर्घटना झाल्यावर जाग येणार का? भरवस्तीत गॅस सिलेंडरची गोदामं का?
Continues below advertisement
मुंबई : वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली आहे. या ठिकाणी सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. एक किलोमीटर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जखमी गोडाऊनमध्ये कामाला होते.
सध्या आग आटोक्यात आली असली तरी आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आग लागल्यानं एकामागोमाग एक असे सिलेंडरचे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारण 10.30 वाजता ही आग लागली असल्याची माहिती आहे. या परिसरात अनेक सेलिब्रेटी देखील राहत असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
Tags :
Versova Gas Cylinder Blast Gas Cylinder Blast Versova Cylinder Blast Versova Special Report Mumbai