Vasai Virar Rains Update : वसई-विरारमध्ये रात्रभर पाऊस, महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी
Continues below advertisement
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या मुलांचं गाऱ्हाणं ऐकलेलं दिसतंय. कारण वसई-विरार महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. रात्रभस कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळं महापालिका प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केलीय.
Continues below advertisement