Vasai : म्हाडाला नॉनव्हेजचं वावडं?घरासाठीच्या अर्जात शाकाहारी की मांसाहारी नमूद करण्याची अटABP Majha

Continues below advertisement

मुंबई आणि परिसरात हक्काचं घर असणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण या घराचं स्वप्न पूर्ण करताना तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी अशा खवचट चौकशा करत असेल तर तुमच्या डोक्यात तिडीक जाईल ना? असाच काहीसा प्रकार वसईत घडलाय. वसईमध्ये पीपीपी तत्वातून सुरक्षा स्मार्ट सिटी हा २ हजार घरांचा गृह प्रकल्प उभारण्यात येतोय. खासगी बिल्डर म्हाडाच्या सहाय्यानं हा प्रकल्प उभारत आहे. यामध्ये २ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्र आणि ठिकठिकाणी अर्ज मागवण्याच्या जाहिरातीही देण्यात आल्या. मात्र, या लॉटरीचा फॉर्म भरताना तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी असा प्रश्न ऑनलाईन अर्जात विचारण्यात आला आहे. तसंच हा प्रश्न अर्ज भरताना अनिवार्य़ करण्यात आलाय. त्यामुळे आव्हाडांच्या म्हाडाला नॉनव्हेजचं वावडं आहे की काय हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जातोय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram