Vasai : वसईच्या समुद्र किनाऱ्यात थरारक बचावकार्य, संशयास्पद बोटीवरील  खलाशाला वाचवलं

 वसईच्या समुद्र किना-यावर संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील  खलाशाला अखेर १२ तासानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरने  रेस्क्यू  करून, सुरक्षीत  बाहेर  काढण्यात  यश आलं  आहे. रफिक शेख  असे  रेस्क्यू करून  काढलेल्या  खलाशाचे  नाव  आहे . सध्या  बोटीच्या  इंजिन मध्ये  बिघाड  झाल्याने  बोट  समुद्रातच  आहे. तिला  दुसऱ्या  बोटीने  बाहेर  काढण्यात  येणार  आहे. सध्या खलाशी  आणि  मालकाला  वसई  पोलिसांनी  ताब्यात  घेऊन  चौकशी  सुरु  केली  आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola