Vasai Crime : दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी, काही तासांत आरोपीला बेड्या

Continues below advertisement

Vasai Crime : दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी, मध्यरात्री आलेल्या फोनने खळबळ 
आपण काय करु शकतो हे बायकोला दाखवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क रेल्वे स्थानक उडवून देण्याचा धमकीचा कॉल कंट्रोल रुमला केल्याची घटना वसई भागात घडलीय. शनिवारी रात्री बारा वाजता वसईच्या पेल्हार येथील वनोठापाडा येथे राहणाऱ्या विकास शुक्ला याने मोबाईलवरुन रेल्वे स्थानक उडवण्याचा धमकीचा कॉल केलाय. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रुमला सदर व्यक्तीने फोन करुन दादर रेल्वे स्थानक आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा कॉल केला होता. तेव्हा धमकीचा कॉल करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तात्काळ शोध घेतला. आणि अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, आरोपीची बायको त्याच्यासोबत राहत नाही, म्हणून बायकोला आपण काय करु शकतो, हे दाखवण्यासाठी कॉल केल्याचं आरोपीनी कबूल केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram