ABP News

Vasai Christmas : वसईतील नाताळ गोठे एका क्लिकवर; मर्सेस गावातील तरुणांनी बनवली वेबसाईट

Continues below advertisement

Vasai Christmas : वसईतील नाताळ गोठे एका क्लिकवर प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला होता, येशूच्या जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात. वसईत नाताळगोठे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. अत्यंत आकर्षक आणि सुंदर देखावे वसई परिसरात बनवले जातात. माञ वसईतील रस्ते स्थानिक लोकांना सोडून कुणालाच माहित नाहीत. त्यामुळे मुंबई, ठाणे, वसई विरार शहरी भागातील लोकांना अशा सुंदर नाताळ गोठ्यापासून वंचित राहवं लागत होतो. आता माञ वसईतील मर्सेस गावातील तरुणांनी वसईतील नाताळ गोठ्यापर्यंत सर्वसामान्यांना थेट पोहचण्यासाठी वेबसाईटच उघडली आहे. www.cribvisit.com या साईटवर गेल्यावर वसईतील महत्त्वाचे नाताळ गोठे आणि तेथे जाण्याचा मार्ग हा गुगुल मॅप द्वारे दाखवण्यात येतो. नालासोपाराचे आमदर क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून या युवकांनी ही आगळीवेगळी पण महत्त्वपूर्ण वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळे आता मनमोहक नाताळ गोठे पाहण्याचा आनंद आता सर्वांना लुटता येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram