Vadala CSMT Local : पूर्वाच्या अपघातस्थळावर चाचणी सुरु असताना पुन्हा अपघात, डबा घसरला
Vadala CSMT Local : पूर्वाच्या अपघातस्थळावर चाचणी सुरु असताना पुन्हा अपघात, डबा घसरला
डबा घसरला सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल घसरलीय. २९ एप्रिलला जिथे लोकलचा डबा घसरला होता. तिथेच आज पुन्हा लोकल घसरली. या पॉईंटची दुरूस्ती करून पुन्हा रिकामी लोकल चालवण्यात येत होती. मात्र चाचणी करणारी लोकलही घसरलीय. यामुळे वडाळा ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. घसरलेली लोकल पुन्हा रूळावर येत नाही तोवर वाहतूक बंद ठेवण्यात येईल.