Mumbai Vaccination : मुंबईत लसीकरणाची वेळ वाढवली, रात्री 11 पर्यंत लसीकरण सुरू राहणार
मुंबईत आजपासून लसीकरणाची वेळ वाढवण्यात आलीय. आता रात्री 11 पर्यंत मुंबईत लसीकरण होणार आहे. कामावरून घरी येणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषत: रेल्वे स्थानकाच्या जवळ ही लसीकरण केंद्रं असतील. त्यामुळे मुंबईतील लसीकरणाला वेग येणार आहे.