ST वाहकाच्या चेहऱ्यावर अज्ञात इसमांनी फेकली शाई, Vasai डेपोतून एसटी सुरू केल्याने चालकावर शाईफेक
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज वसईत गाळबोट लागलं आहे. एसटी सेवा चालू ठेवल्याने एका अज्ञात इसमाने वाहकाच्या तोंडाला काळं फासलं आहे. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस सीसीटीवीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.