Mumbai University Exam | मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या डिसेंबर जानेवारमध्ये होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. शिवाय, त्यासाठी शाखेनुसार पदवी, पदव्युत्तर क्लस्टर कॉलेजची विभागणी केली असून त्यामध्ये लीड कॉलेज हे परीक्षेचे नियोजन करणार आहे.