Jehangir Art Gallery मध्ये अनोखं प्रदर्शन, भूगर्भातील बदलांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

दगडाला आकार दिला तर त्याचं सोनं होतं असं म्हणतात आणि तसाच प्रयत्न स्वप्निल गोडसे या कलाकारानं मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमधल्या आपल्या प्रदर्शनात केला आहे. या प्रदर्शनात लोखंडासह स्टील आणि तांबे या धातूंचा वापर करून जगातील भूगर्भीय बदलांवर कलात्मकरित्या प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रदर्शनातून एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. दगडातील परिवर्तन मानवी जीवनातल्या परिवर्तनाशी जोडण्याचा प्रयत्न स्वप्निल गोडसे यांनी या प्रदर्शनातून केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola