Deepak Kesarkar :वेळीच सुधरले नाहीत तर राणेंप्रमाणे त्यांच्या मुलांच्या राजकीय कारकीर्दीचाही अंत
Continues below advertisement
Deepak Kesarkar Kankavli : नारायण राणे यांचा तोल गेलेला आहे. आपण किती शूर आहोत हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात. ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणे यांची कालची पत्रकार परिषद आपल्या मुलाला वाचवण्यासाठी होती. कोण दीपक केसरकर विचारणारे नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या खासदारकीचा झालेला पराभव आठवावा. म्हणजे दीपक केसरकर कोण हे तुमच्या लक्षात येईल, असं दीपक केसरकर म्हणाले.
Continues below advertisement