Anurag Thakur : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत .अनुराग ठाकूर यांचा हा एक दिवसीय दौरा असल्याचं कळतंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली असून भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे .या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, आणि अनुराग ठाकूर या मतदारसंघात दुसऱ्यांदा येत असल्यामुळे भाजप या मतदारसंघावर दावा करणार का? अशा चर्चा आता रंगल्यात.
Continues below advertisement