Mumbai : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांनी भरलेली अज्ञात गाडी
बोरिवली पूर्वेत मागाठाणे विधानसभा चे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा दहिसर इथला नवीन कार्यालयाजवळ एका स्कार्पियो मध्ये फटाक्याने भरलेली एक स्कॉर्पियो गाडी आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र या गाडीत कोणतीही स्फोटके नसून शोभेचे फटाके असल्याचे सिद्ध झाले आहे.ही गाडी याच विभागात रहाणारे फटाके विक्रेते सुरेश बोबडे यांचे आहेत.दुकानात पाणी भरल्याने त्यांनी हे फटाके गाडीत ठेवले असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप चव्हाण यांनी सांगितले आहे.