ABP News

Mira Road Crime : अनधिकृत फेरीवाल्याची दादागिरी, पालिकेच्या फेरीवाला पथकावर रॉडनं हल्ला

Continues below advertisement

भाईंदरमध्ये अनधिकृत फेरीवाल्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. फेरीवाल्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पालिकेच्या फेरीवाला पथकावर एका फेरिवाल्याने लोंखडी रॉड ने मारल्याची घटना घडली आहे. त्यात एका कर्मचा-याच्या मनगटावर मार लागला आहे.  याप्रकरणी फेरीवाल्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान मीरा भाईंदर महानगरापालिकेचं फेरीवाला निर्मुलन पथक त्याच बरोबर महाराष्ट्र पोलीस बळाचे ६ कर्मचा-यांच पथक भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्ली नाक्यावर असलेलं ओम साई फुटवेअर दुकानासमोरील रस्त्यावर चप्पलांचे अनधिकृत स्टॉलवर कारवाई करत असताना, त्या अनधिकृत स्टॉलचा चप्पल विक्रेता आरोपी अब्दुल रेहमान हाशमी याने कारवाई करणा-या पथकातील कर्मचा-यावर पाईने हातावर जोरदार फटका मारला, तसेच दुस-याला ठोशाबुक्क्यांने ही मारहाण केली. फेरीवाल्याच्या या दादागिरीविरोधात फेरीवाला पथक प्रमुख राकेश ञिभुवन याने काल राञी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पोलिसांनी आरोपी अब्दुल रेहमान हाश्मी याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३३२, ५०४ आणि फौजदारी कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करुन, अटक केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram