Ulhasnagar Robbery : उल्हासनगरमध्ये चोरट्यांचा प्रताप, मुथुट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न फसला

Continues below advertisement


उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेंच्युरी रेयॉन  कंपनी समोर असलेल्या मुथुट फायनान्स बँकेला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा डाव अखेर फसलाय. या घटनेतील काही संशयीत आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेत. मुथुट फायनान्स या बँकेच्या बाजूला असलेल्या पावर लाँड्रीच्या दुकानातील भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. लाँड्रीचे मालक शांती कानोजिया यांनी जेंव्हा दुकान उघडलं तेंव्हा त्यांना दुकानात भगदाड पडल्याचं दिसून आलं. तसंच या दुकानातून मुथुट फायनान्स या बँकेत प्रवेश करून चोरी करण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचं देखील दिसून आलं. या घटनेनंतर कानोजिया यांनी तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथकं तैनात करण्यात आलीयेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram