
Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेचा अनधिकृत मच्छी मार्केट आणि झोपडपट्टीवर हातोडा
Continues below advertisement
संजय गांधी नगर भागात महापालिकेच्या राखीव भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून ही अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. ही जागा खाली करण्याची सूचना महापालिकेने वारंवार इथल्या रहिवाशांना दिली होती, मात्र तरीदेखील इथले रहिवाशी आपली घरं खाली न करता या ठिकाणी राहत होते, मात्र अखेर उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर तोडक कारवाई करीत हा भूखंड मोकळा केला. तसेच त्याच जागेच्या बाजूला असलेलं महापालिकेचं वाहन पार्किंगच्या जागे वरही अतिक्रमण झाले होते. त्यावर कारवाई करत जागा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकारी प्रियंका राजपूत यांनी दिली आहे.
Continues below advertisement