Ulhasnagar : सोनसाखळी चोराचा महिलेवर हल्ला, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुबाडलं
पीडित महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून चोराने दुसरीकडे इशारा करुन त्या महिलेची मान वळताच गळ्यातील सोन्याची चैन ओढून आपल्या दुचाकीवरुन निघाला, महिलेला लगेच कळलं आणि ती चोरट्याचा मागे धावली, त्या चोरट्याचा शर्ट पकडला मात्र चोरट्याने या पीडित महिलेला साधारण दहा ते पंधरा फूट फरफटत नेलं, शेवटी या महिलेचा हातातून चोरटा सुटला आणि चोर पळून गेला, या महिलेने त्या चोराला पकडण्याचा अथक प्रयत्न केला, मात्र अपयशी ठरली, या झटापटीत महिला जखमी झाली असून तिच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे.