Uddhav Thackeray meets Pawar : शरद पवारांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.. काही वेळापूर्वी ठाकरे मातोश्रीवरुन रवाना झालेत.. ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे पवारांची भेट घेतील. यावेळी ठाकरे पवारांच्या तब्येतीची विचारपूस करतील.. काल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांनी काही वेळ विश्रांती घेत शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली.. या अधिवेशानंतर पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाले... शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पवारांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती...