Beed : अंबाजोगाई शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, 66 जनावरांची केली सुटका
बीडच्या अंबाजोगाई शहरातल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 66 जनावरांची सुटका केली. अंबाजोगाईत नगरपालिकेल्या गाळ्यात कत्तलखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी बाराभाई गल्लीमधील कत्तलखान्यावर छापा टाकला. त्यात 12 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 66 गोवंशीय जनावरांची सुटका केली. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.