Uddhav Thackeray to Mumbaikar | घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गिरणी कामगारांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. गिरणी कामगारांसाठी 3 हजार 894 घरांची सोडत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाली. सोडतीमध्ये मिळालेलं एकही घर विकू नका, घर विकून मुंबईच्या बाहेर जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना केलं आहे. त्याचबरोबर तुमच्या हक्काच्या घरात मला चहाला बोलवा असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री अस्लम शेख उपस्थित होते.