Uddhav Thackeray Sabha : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, बंडानंतर ठाकरे काय बोलणार?
दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार आहे. कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केलाय... आज सायंकाळी 7.30 वाजता नेस्कोच्या मैदानात उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. दसऱा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरुन चाललेल्या घडामोडींवर तसंच शिंदे गटाच्या टीकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष लागलंय. तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
Tags :
ABP Majha LIVE Chief Minister Maharashtra News Marathi News Abp Maza Live Narayan Rane Abp Maza Marathi Live Live Tv Shiv Sena ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News Eknath Shinde Dassara Melawa