Shiv Sena Symbol : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं; Uddhav Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले

Maharashtra Politics Shivsena: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Electon Symbol) गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे सांगितले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे.  इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतदेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola