Uddhav Thackeray Full Speech : मुख्यमंत्री शिंदे, अमित शाह ते मोहन भागवत, वज्रमूठ सभेत हल्लाबोल

Continues below advertisement

Uddhav Thackeray Full Speech : मुख्यमंत्री शिंदे, अमित शाह ते  मोहन भागवत, वज्रमूठ सभेत हल्लाबोल

Uddhav Thackeray Speech Highlights:  मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा (Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha) पार पडली. आजच्या या जाहीर सभेत मुंबई आणि परिसरातून शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Uddhv Thackeray Faction),  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आजच्या वज्रमूठ सभेत मविआच्या नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना थेट आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे....

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले? Uddhav Thackeray Speech Highlights

- रक्ताचे बलिदान देऊन मराठी माणसाने आपली राजधानी मिळवली. 
- संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास स्मरणात ठेवले पाहिजे. हा संघर्षाचा इतिहास विसरलो तर मुंबईचे लचके तोडतील...
- मुंबईवर अत्याचार...अवहेलना सुरू आहे हे सरकार त्यावर काहीच बोलत नाही...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील प्रचार सभेत काँग्रेसच्या लोकांनी 91 शिव्या दिल्या, असे सांगितले. शिव्या देणे वाईटच आहे. मग, तुमची भोकं पडलेली टिनपाट आदित्य, माझ्याबद्दल...कुटुंबियांबद्दल बोलतात...त्याबद्दल का बोलत नाही....तुमची लोक बोलल्यावर आम्हीदेखील बोलणार...त्याला प्रत्युत्तर देणारच
- 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा. प्रकल्पाच्या जागेसाठी पत्र दिलं. पण त्या पत्रात पोलीस कारवाई करा असं कुठं म्हटलं. प्रकल्पासाठी स्थानिकांची मंजुरी महत्त्वाची ही आमची भूमिका
-  माझ्या पत्रामुळे बारसूमध्ये पोलिसांनी कारवाई केली म्हणता मग, पालघरमध्ये आदिवासींच्या घरावर बुलडोजर फिरवला, त्यासाठी कोणी पत्र दिलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram