Sanjay Raut Vajramuth Sabha Full Speech : महाराष्ट्राची वज्रमूठ सभा मन की नाही फक्त काम की बात करेल!

Sanjay Raut Vajramuth Sabha Full Speech : महाराष्ट्राची वज्रमूठ सभा मन की नाही फक्त काम की बात करेल!

 

मुंबई: अजितदादांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे, दादा येणार... दादा बोलणार आणि दादा जिंकणार अशी स्तुतीसुमने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उधळली. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला होता, त्यानंतर आज संजय राऊत यांनी जाहीर भाषणात अजित पवारांची स्तुती केली आहे. 

महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचं सर्वांनाच आकर्षण आहे. आज सकाळपासून चर्चा सुरू होती की वज्रमूठ सभेसाठी अजित पवार येणार का ना नाही? त्यांना मला सांगायचं आहे की दादा येणार... दादा बोलणार आणि दादा जिंकणार. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना आहे तोपर्यंत मुंबईचा लचका तोडता येणार नाही, म्हणून दिल्लीश्वरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. आज आमच्यासोबत सगळे आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, दलित आणि मुस्लिम मावळे. त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार असून ती कुणालाही तोडता येणार नाही. 

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात कुणी काही बोललं तर त्याच्यामागे ईडी लावली जाते, त्याला आत टाकलं जातं. दुसऱ्या बाजूला देशाला लुटणारे, बँकांना लुटणारे चोर भाजपमध्ये घ्यायचे आणि त्यांना शुद्ध करायचं. सुबहका भ्रष्टाचारी भाजपमध्ये शामिल होता है तो वो देशभक्त कहलाता है. आम्ही तुरुंगात जाऊन आलो, तुमच्या बापालाही घाबरत नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola