Thackeray vs Shinde : राज्यभरात अनेक ठिकाणी शिंदे-ठाकरे गट आमनेसामने ABP Majha

राज्यात आज अनेक ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं समोर आलं... पहिलं म्हणजे दसरा मेळाव्यावरुन आता शिंदे आणि ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे... आणि त्याचं कारण म्हणजे पालिकेच्या विधी विभागानं नोंदवलेलं मत... दुसरीकडे रत्नागिरीच्या दापोलीत रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेयत... तर नाशकातही रामदास कदमांविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आंदोलनं केली यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं दिसून आलं, तर तिकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही नवरात्री उत्सवावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola