Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन
शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजच्या वाढदिवसाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर गर्दी करण्याची शक्यता आहे. यावेळी हारतुरे, पुष्पगुच्छ आणू नका. फक्त शुभेच्छा द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. याशिवाय शिवसेनेवर निष्ठा असल्याची शपथपत्रं हेच वाढदिवसाचं गिफ्ट असेल असं सांगत उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रांचे गट्टे देण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलंय. न्यायालयीन लढ्यात ही शपथपत्रं महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शिवसेना पदाधिकारी आज त्यांना शपथपत्रांचं गिफ्ट देतील.
Tags :
Abp Majha Uddhav Thackeray Uddhav Thackeray LIVE Uddhav Thackeray Speech Uddhav Thackeray Birthday ABP Majha Uddhav Thackeray 62 Birthday