Mumbai : आगामी मुंबई मनापा निवडणूक होणार? उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काय दिले आदेश ?

Continues below advertisement

मुंबई :  निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. सोमवारी  उशीरा रात्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत होऊ घातलेल्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचं समजतंय. विरोधकांना योग्य वेळी उत्तर देईन, मात्र कार्यकर्त्यांनी शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जरी असले तरी शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका जीव की प्राण समजला जातो.  येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेही आतापासूनच तयारीला लागले आहेत. काहीही करून पालिकेतली सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा शिवसेनेचा मानस आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram