Lifeline Hospital Management च्या दोघांना अटक, कोरोना घोटाळाप्रकरणी पोलिसांची कारवाई : ABP Majha

Continues below advertisement

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं १०० कोटींच्या कथित कोविड घोटाळा प्रकरणात बाळा कदम आणि राजीव साळुंके या दोघांना अटक केली आहे. ते दोघंही लाईफलाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या पदाधिकारी आहेत. कोरोना काळात कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणाचा ईडी आणि मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. हा कथित घोटाळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला असून तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली हे कंत्राट संजय राऊत यांच्या सांगण्यावरून लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटला देण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram