Omicron in Mumbai : मुंबईच्या चिंतेत वाढ, मुंबईत Omicron चे दोन रुग्ण, Seven Hills मध्ये उपचार सुरू

Omicron Cases In Mumbai : ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय.  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola