समीर वानखेडे हे अधिकारी, त्यांनी स्वत:ला अशाप्रकारच्या वादांपासून दूर ठेवायला हवं : Prakash Ambedkar
समीर वानखेडे हे अधिकारी आहेत. त्यांनी स्वत:ला अशाप्रकारच्या वादांपासून दूर ठेवायला हवं, अशी प्रतिक्रिया रिपाइं अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलीय. तर नागालॅंड प्रकरणावर बोलताना ते म्हणाले “काही संघटना अतिरेकी पद्यतीने वागून सेव्हन सिस्टर घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या सरकारला कसं डिल करावं हे कळत नाही. अमित शाह सध्या त्याठिकाणी आहेत त्यांनी त्याठिकाणी जाऊन कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती. चूक झाली आहे आमची हे म्हणण्याचं धाडस देखील गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये नाही हे दुर्दैव आहे.”