Bhandup : भांडुपगावात घरावर प्लास्टिक कागद टाकताना ओव्हरहेड वायरला दोन मुलं चिकटली, दोघ जखमी
भांडुप व्हिलेज गावात चंदनवाडी सोसायटी मध्ये दुमजली घरावर प्लास्टिकचा कागद टाकण्यास गेलेली दोन मुले हायटेन्शन वायरला चिटकल्याची घटना दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली आहे.यात वीस वर्षीय झूबेर शेख हा 80 टक्के भाजला असून 22 वर्षीय प्रदीप यादव (22 वर्ष) हा दहा टक्के भाजला आहे.बंडू ठाकरे नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर कागद टाकण्यास या मुलांना त्यांच्या दुमजली घरावर चढवले होते.